अर्थकारणताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

आरटीआय कार्यकर्ते विजय लोंढे यांच्या पाठपुराव्यामुळे नगर-मनमाड रस्ता व बायपाससाठीचा 515 कोटींचा निधी उघड

अ.नगर (विशेष प्रतिनिधी): विजय लोंढे 

नगर-मनमाड रस्ता चौपदरीकरण आणि अहमदनगर बायपासच्या कामासाठी केंद्र सरकारने एकूण 515 कोटी रुपयांचा मोठा निधी मंजूर केला आहे. या रखडलेल्या महामार्गाच्या कामाबाबत सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार विजय लोंढे यांनी सातत्याने केलेल्या यशस्वी पाठपुराव्यामुळे आणि माहिती अधिकाराचा (RTI) प्रभावी वापर केल्यामुळेच ही अधिकृत आकडेवारी आणि कंत्राटदारांची वस्तुस्थिती समोर आली आहे.

या अंतर्गत अहमदनगर बायपास ते सावळी विहीर कामासाठी ३१३.२० कोटी, सावळी विहीर ते मनमाड रुंदीकरणासाठी ४१८.२० कोटी आणि उर्वरित कामासाठी सर्वाधिक ५१५.०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. विजय लोंढे यांनी शासकीय स्तरावर केलेल्या या जागरूक प्रयत्नांमुळे प्रशासनाचा पारदर्शक कारभार समोर आला असून, रखडलेल्या रस्त्याच्या कामाला गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांच्या या जनहितार्थ केलेल्या चांगल्या कामाचे नागरिकांमधून कौतुक होत आहे.

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.