ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
सह्याद्री चौकात अवैध ‘मावा’ विक्रीचा सुळसुळाट; पोलीस निरीक्षकांनी लेखी हमी द्यावी!
विजय लोंढे (प्रतिनिधी अहिल्यानगर

एमआयडीसी (अहिल्यानगर):
येथील गजबजलेल्या सह्याद्री चौकात बेकायदेशीर मावा आणि गुटख्याची विक्री राजरोसपणे सुरू आहे. स्थानिक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे तरुणाई विळख्यात सापडली असून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
“जर एमआयडीसी परिसरात अवैध धंदे चालत नाहीत, तर पोलीस निरीक्षकांनी तशी लेखी हमी द्यावी,” असे थेट आव्हान आता पत्रकार आणि नागरिकांनी दिले आहे. स्थानिक पोलिसांच्या भूमिकेमुळे या प्रकरणाची तक्रार थेट पोलीस अधीक्षक (SP) यांच्याकडे करण्यात येणार असून, तात्काळ कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.



